30 जून 2026 रोजी बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा येथे त्यांच्या सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, झाडाचे रोप व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या भावी आयुष्यासाठी उत्तम आरोग्य व दीर्घायुष्याच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.
सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये विविध पोलीस ठाणे, नियंत्रण कक्ष, जिल्हा वाहतूक शाखा, सीसीटीएनएस, शिवाजीनगर, रायपूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, तामगाव, शेगाव ग्रामीण आदी ठिकाणी कार्यरत अधिकारी व अंमलदारांचा समावेश आहे.
कार्यक्रमास सुमारे 110 कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते. समारोपानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.
मो आकील बुलडाणा





